- rat२७p३.jpg -
P२६O३३६७१
अनिकेत बापट
---------
अनिकेत बापट यांना ‘गौटेक’ पुरस्कार
जागतिक स्तरावर दखल ; देशी गोसंवर्धनातील कार्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः पुणे येथे २० ते २३ मार्च या कालावधीत झालेल्या ‘ग्लोबल गौटेक समिट २०२६’ मध्ये चिपळूण येथील निसर्गोपचार तज्ज्ञ अनिकेत बापट यांना प्रतिष्ठित ‘गौटेक २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशी गोवंश संवर्धन आणि पंचगव्य चिकित्सा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल या जागतिक स्तरावरील परिषदेत घेण्यात आली.
चारदिवसीय समिटमध्ये मानवी आरोग्य, शेती, पर्यावरण आणि अध्यात्म या क्षेत्रांत देशी गायीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र गौसेवा आयोगप्रमुख शेखर मुंदडा, डॉ. कुलकर्णी, डॉ. वल्लभ कतारिया तसेच विविध चार राज्यांच्या गौसेवा आयोगप्रमुख या वेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनीही मार्गदर्शन केले.
बापट यांनी पंचगव्य आणि निसर्गोपचार विषयातील प्रगत शिक्षण कोल्हापूर, नाशिक आणि तामिळनाडू येथून पूर्ण केले आहे. २०१६ पासून ते या क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचे कार्य विस्तारलेले आहे. या कार्यक्रमात स्थानिक कोकण कपिला जातीच्या गायींचे जतन आणि संवर्धन, दर्जेदार पंचगव्य औषधनिर्मिती आणि त्या द्वारे रुग्णांवर उपचार, रासायनिक शेतीला पर्याय म्हणून गोआधारित नैसर्गिक शेतीचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी ‘गोकृपा अमृत कल्चर’चे महाराष्ट्रभर मोफत वाटप आणि विविध गोशाळांना तांत्रिक मार्गदर्शन आणि युवकांना पंचगव्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.