कोकण

नेरुर ग्रामीण रुग्णालयात आज महाआरोग्य शिबिर

CD

नेरुर ग्रामीण रुग्णालयात
आज महाआरोग्य शिबिर
बेळगाव केएलईच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या १४२ डॉक्टर-स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे व आयुष्मान भारतचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते उद्या (ता. २८) सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल नेरुरकर, के.एल.ई.चे डॉ. माधव प्रभू, के.एल.ई.चे संचालक डॉ. अमल्लप्रभू कुडचे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, अजित शिरोडकर, गौड ब्राह्मण सभेच्या राजश्री सामंत, कुडाळ पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, कुडाळ पंचायत समिती सदस्य (नेरुर) दीप्ती नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर उपस्थित राहणार आहेत. या मोफत आरोग्य शिबिराचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT