कोकण

पावसमधील नव्या पुलाचा एक पिलर पूर्ण

CD

-rat२७p१८.jpg-
P२६O३३७३१
रत्नागिरी ः पावस येथे सुरू असलेले नव्या पुलाचे काम.
---------
पावसमधील पुलाचा एक पिलर पूर्ण
६ कोटी ४१ लाखांचा पूल; वर्षभरात वाहतुकीस खुला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी-राजापूर मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. ६ कोटी ४१ लाखाच्या या पुलासाठीच्या तीनपैकी एका पिलरचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे गर्डरदेखील तयार करण्यात आले असून, ते नदीपात्रात ठेवण्यात आले आहेत. येत्या वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
शासकीय नोंदीनुसार, हा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील रेवस-रेड्डी या राज्यमार्ग क्र. ३ वर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता आधीच प्राप्त झाली होती. या पुलाच्या कामासाठी ६ कोटी ४१ लाख ६६ हजार ६९० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १८ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुलाच्या तांत्रिक रचनेचा विचार केला तर हा पूल ‘नॉन सबमर्सिबल’ स्वरूपाचा असून, त्याला ३० मीटरचे दोन स्पॅन आहेत. पावसचा हा पूल या भागातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT