कोकण

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हवेत २५०० कोटी

CD

सिंचन प्रकल्पांना गतीचा निर्णय
पोयनार, न्यू मांडवे प्रकल्पांना मंजुरी ; २५०० कोटींची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : जिल्ह्यातील एकूण २० सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या निधीच्या उपलब्धतेनंतर जिल्ह्यातील रखडलेली जलसंपदा विभागाच्या धरणाची कामे मार्गी लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, खेड तालुक्यातील ‘पोयनार’ आणि ‘न्यू मांडवे’ या दोन महत्त्वाच्या लघुपाटबंधारे प्रकल्पांना राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार असून, हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खेड तालुक्यातील पोयनार गावात निरगुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पोयनार प्रकल्पासाठी २६५.३८ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे. या धरणाचे ६० टक्के मातीकाम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या नवीन धोरणानुसार हा प्रकल्प बंदिस्त नलिका वितरण प्रणालीवर आधारित असून, या द्वारे धामणी, ऐनी, जामगे, साखरोळी आणि कर्जीसारख्या १४ गावांमधील ११५१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे.
जगबुडी नदीच्या उपखोऱ्यात उभारल्या जाणाऱ्या ‘न्यू मांडवे’ प्रकल्पालाही १९५.९६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे तालुक्यातील ५ गावांच्या ९९६ हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पात उघड्या कालव्यासोबतच १० ते २१ कि.मी. दरम्यान बंदिस्त नलिका प्रणालीचा वापर केला जाणार आहे. रत्नागिरी पाटबंधारे मंडळांतर्गत सध्या ३ मध्यम आणि १७ लघुपाटबंधारे असे एकूण २० प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. जून २०२५ अखेरपर्यंत यातील प्रकल्पांद्वारे सुमारे २० हजार ६८५ हेक्टर सिंचन क्षमता आधीच निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT