कोकण

विद्युत खांबावर कोसळली विज

CD

विद्युतखांबावर वीज कोसळली
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः संगमेश्वर तालुक्यात काल (ता.२६) गारपिटीसह पडलेल्या अवकाळी पावसात तीन ठिकाणी वीज कोसळली. त्यात शिवणे येथे वीजखांबावर वीज कोसळली. सुदैवाने, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु या घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संगमेश्वर तालुक्यात गुरूवारी (ता. २६) सायंकाळी वादळी पाऊस झाला. या दरम्यान शांताराम जाधव यांच्या घराशेजारी अचानक वीज कोसळली. या विजेच्या तडाख्यामुळे वीजखांबापासून घरापर्यंतची सर्व्हिस वायर पूर्णपणे जळून खाक झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वीज कोसळली त्या ठिकाणी शांताराम जाधव उभे होते. सुदैवाने, ते या घटनेतून थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. परिसरातील लोकप्रतिनिधींनीही घटनेची माहिती जाणून घेतली. अवकाळी पावसामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असतात. त्यामुळे कोकणातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT