कोकण

ज्यूट, बांबू उत्पादन केंद्र लवकरच

CD

ज्यूट, बांबू उत्पादन केंद्र लवकरच

मोहन होडावडेकर : कुडाळमध्ये प्रशिक्षणाचा समारोप

कुडाळ, ता. २८ : जिल्ह्यात ज्यूट व बांबू मॅटपासून नावीन्यपूर्ण प्रशिक्षणाचा समारोप येथे झाला. जिल्ह्यात लवकरच उत्पादन केंद्राची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे प्रतिपादन ‘चिवार’ संस्थेचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी केले.
नॅशनल ज्यूट बोर्ड (वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार) यांच्यातर्फे आणि ‘सेंटर ऑफ बांबू व्हॅल्यू ॲडिशन अँड रिसर्च’ (चिवार) केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यात प्रथमच हे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रावर प्राथमिक, कौशल्यवृद्धी व कलाकृती अशा तीन टप्प्यांत ३५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यासाठी नॅशनल ज्यूट बोर्डाचे विशेष प्रशिक्षक सुबोतो मॉडल (कलकत्ता) व डिझायनर अदित रोशन (तामिळनाडू) उपस्थित होते. प्रशिक्षणाचा समारोप ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका विभाग) अभिजि परब व तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड यांच्या उपस्थितीत झाला.
श्री. होडावडेकर यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, येत्या वर्षात १०० महिलांना ज्यूट बोर्डाच्या सहयोगाने प्रशिक्षण देणे व उत्पादन केंद्र सुरू करणे हा मानस आहे. याद्वारे १०० ज्यूट उत्पादक व १०० बांबू चटई उत्पादक महिलांना कायमस्वरुपी रोजगार देण्याचा उद्देश आहे,’’ असे त्यांनी सांगितले. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या ‘उमेद’ अभियानाच्या सहयोगाने राबविला जात आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक (ग्रामीण विकास यंत्रणा) आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष (उमेद) यांचे विशेष आभार मानले. प्रशिक्षणानंतर कच्चा माल सवलतीच्या दरात ज्यूट बोर्डामार्फत उपलब्ध होईल आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र ‘आउटलेट’ उभारले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या पहिल्या बॅचसाठी वालावल, कवठी, चेंदवण, नेरुर आणि सरंबळ या विभागांतील २० निवडक महिलांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या प्रसंगी ‘चिवार’चे संचालक मिलिंद ठाकूर, महेश राणे, प्रिया पिंगुळकर, रंजना धामापूरकर, प्रागी पावसकर, नंदा पिंगुळकर, कार्यक्रम समन्वयक प्रशांत काराणे, शामसुंदर प्रभू, ‘चिवार’ व्यवस्थापक सत्यवान चव्हाण, अमोल विबवणेकर, नवनीत मेस्त्री, नंदकिशोर पानवलकर आणि एम.आय.डी.सी.चे समन्वयक आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.
---
महिलांना आवाहन
प्रमुख अतिथी श्री. राठोड यांनी कुडाळ तालुक्यात समूह विकास तत्त्वावर हा कार्यक्रम राबवण्यासाठी विशेष नियोजन केले जात असल्याचे सांगितले. महिलांनी पुढील प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा व्यवस्थापक श्री. परब यांनी या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT