कोकण

सावंतवाडीत वीस मालमत्ता सील

CD

33925

सावंतवाडीत वीस मालमत्ता सील

नगरपरिषदेची कारवाई; थकबाकी वसुलीसाठी मोहीम तीव्र

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ : येथील नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाद्वारे शहरातील २० मालमत्ता सील केल्या आहेत.
या पथकात प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक वैभवकुमार अंधारे, गोविंद गवंडे, कर निरीक्षक प्राची पाटील, लेखापाल प्रसाद बटवाल, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत आणि नगररचनाकार गौरव बुगड यांचा समावेश आहे. शहरात निवासी, बिगर निवासी, मिश्र व औद्योगिक अशा एकूण ११,९५७ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नगरपरिषदेने वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. १ मार्चपासून सुरू झालेली ही कारवाई ३१ पर्यंत अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील मालमत्ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप करण्यात आली असल्याने, आता कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
------
सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू
नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत सावंतवाडी नगरपरिषदेचे ‘नागरी सुविधा केंद्र’ कार्यालयीन सुटीच्या दिवशीही कर भरणा करण्यासाठी सुरू राहणार आहे. शहरातील नागरिकांनी आपली थकीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर तत्काळ भरून नळतोडणी व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT