कोकण

‘श्री विनायक सुझुकी’मध्ये ‘ई-ॲक्सेस’ मॉडेल ‘लॉन्च’

CD

33930

‘श्री विनायक सुझुकी’मध्ये
‘ई-ॲक्सेस’ मॉडेल ‘लॉन्च’

कुडाळात पहिल्याच दिवशी पसंती

कुडाळ, ता. २८ : दुचाकीप्रेमींची लाडकी स्कूटर ‘सुझुकी ॲक्सेस’ आता इलेक्ट्रिक अवतारात कुडाळवासीयांच्या भेटीला आली आहे. येथील श्री विनायक सुझुकी येथे सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर ‘ई-ॲक्सेस’चे मॉडेल दाखल झाले असून, या गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. आज शोरूममध्ये या गाडीचे दिमाखदार ‘लॉन्चिंग’ झाले.
या नव्या मॉडेलला ग्राहकांकडून पहिल्या दिवसापासूनच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शोरूमने सांगितले.
या प्रसंगी ‘श्री विनायक सुझुकी’चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे, सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व्हिस एरिया मॅनेजर निनाद पारखे, ‘श्री विनायक सुझुकी’चे जनरल मॅनेजर मयूर पाताडे, ‘महावितरण’ कुडाळचे सहायक अभियंता प्रथमेश केळकर, ‘ई-ॲक्सेस’चे पहिले ग्राहक गोपाळ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘सुझुकी ई-ॲक्सेस’ ही स्कूटर प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ९५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकते. यामध्ये अत्याधुनिक ‘एलएफपी’ बॅटरी वापरली असून, तिचे आयुष्य सामान्य बॅटरीपेक्षा ४ पटीने अधिक आहे. ‘नॅचरल राइड फील’साठी यामध्ये ‘सिंक्रोनाइझ्ड थ्रॉटल रिस्पॉन्स’ दिला आहे, ज्यामुळे प्रवास सुखद होतो. बॅटरी कमी असतानाही गाडीच्या वेगावर परिणाम होत नाही, ती सतत योग्य पॉवर देते. सध्या या गाडीच्या खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक आणि ‘व्हॅल्यू पॅक’ उत्पादन असलेली ही ई-ॲक्सेस पाहण्यासाठी आणि बुकिंगसाठी ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी,’’ असे आवाहन ‘श्री विनायक सुझुकी’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : भिवंडीत गॅस लायटर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

“हा अनुभव शब्दात न मावणारा” कलर्स मराठीच्या नायिका तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

SCROLL FOR NEXT