कोकण

चिपळूणात संत शिरोमणी रोहिदास महाराज ग्रंथ प्रकाशन सोहळा

CD

सावर्डेत आज ग्रंथप्रकाशन सोहळा
संत रोहिदास महाराज जयंती ; सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः सावर्डे येथील माता शारदा फाउंडेशनतर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे उद्या (ता. २९) आयोजन केले आहे. दुपारी ३ ते ६.३० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी अदृश्य श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचवेळी त्यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशित होणार आहे. उद्या दुपारी ३ ते ३.३० वा. विविध संतांच्या पालख्यांचे आगमन व स्वागत होणार आहे. ३.३० ते ५.१५ संत रोहिदास महाराजांच्या निवडक पदांचे गायन कार्यक्रम होईल. यामध्ये संगीत प्रमोद देशपांडे, गायक राजाभाऊ शेंबेकर, वरद केळकर आणि अनन्या खेराडे हे गायन करणार आहेत. यामध्ये सहकलाकार अमित ओक, प्रथमेश देवधर, गौरव पाटकर, आदित्य खरे, सुश्रुत चितळे, चैतन्य जोगळे आणि निरूपण धनंजय चितळे करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५.१५ ते ६ वा. ग्रंथप्रकाशन व अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सायंकाळी ६ वा. पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
कार्यक्रमात सहयोगी संस्था म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण, रोहिदास समाजसेवा संघ चिपळूण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिपळूण, संस्कारभारती चिपळूण, शारदा संगीत, साहित्य, कला, क्रीडा अकादमी सावर्डे आणि ज्ञातीबांधव संस्था व वारकरी सम्प्रदाय सामील होणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत सावर्डेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

“हा अनुभव शब्दात न मावणारा” कलर्स मराठीच्या नायिका तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

Junnar News : जुन्नरमध्ये महिलांच्या टोळीचा 'हांडे'फेरीवर डल्ला! गोडाऊन फोडून लंपास केले ९० तांब्याचे हांडे; एलसीबीने महिलांच्या मुसक्या आवळल्या

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT