rat२८p१०.jpg-
26O33907
लांजा- गाळउपसा कार्यक्रमाचा प्रारंभ पंचायत समिती सदस्या रसिका मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.
-------
मुचकुंदी नदीतील गाळ उपशाला प्रारंभ
पूरनियंत्रणासाठी २० लाखांचा निधी ; ग्रामस्थांतून समाधान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः विलवडे, वाकेवाडी येथील मुचकुंदी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा प्रारंभ काल सकाळी करण्यात आला.
दरवर्षी पावसात मुचकुंदी नदी पुराचा फटका नदीकाठच्या वाडीवस्त्यांना बसत असल्याने आमदार किरण सामंत यांनी जिल्हा नियोजनातून गाळ उपसा करण्याची मागणी केली होती. विलवडे गावातील टाकेवाडी जवळून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा, याकरिता सामाजिक कार्यकर्ते संदीप राडये आणि उपतालुकाप्रमुख आणि विलवडे उपसरपंच बाळू खामकर यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार सामंत यांनी तत्काळ उपसा करण्यासाठी जिल्हा नियोजनामधून वीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. काल सकाळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गाळ उपसा कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वाकेड गणातील पंचायत समिती सदस्या रसिका मेस्त्री यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या वेळी विलवडे उपसरपंच सुहास खामकर, नाम फाउंडेशन सदस्य समीर जाणवलकर, विभागप्रमुख संतोष साठले, संदीप राडये, बाबा खेतल, अक्षय खेतल, दत्ताराम राडये, एकनाथ खेतल आदी उपस्थित होते.