rat२८p६.jpg-
26O33911
संगमेश्वर ः क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी .
------------
क्रीडा साहित्याने शाळांना बळ
एसआय ग्रुप-सेवा सहयोग फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः एसआय ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी आंगवली हायस्कूलचे शिक्षक शैलेश कदम, संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक व सोनवडे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अभिजित कदम आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोसुंब हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत राऊत यांनी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या संस्थेची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल, तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी, शिक्षण व सहशैक्षणिक, आरोग्य, शेती, पर्यावरण, क्रीडा, कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात संस्था राबवत असलेले विविध कार्यक्रम व उपक्रम या संबंधीची माहिती दिली. संस्थेच्या भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनाची माहिती विशद केली.
संगमेश्वर तालुक्यातील शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप शैलेश कदम, अभिजित कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फुणगूस हायस्कूलचे शिक्षक सुरेश रणदिवे व दाभोळे हायस्कूलचे शिक्षक मनोज कनावजे यांनी सदर साहित्य शाळांना कसे उपयुक्त असून, त्याचा शाळांना कसा फायदा होणार आहे हे सांगून एसआय ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांचे आभार व्यक्त केले. संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाळांमध्ये आंगवली हायस्कूल, तुळसणी हायस्कूल, कोसुंब हायस्कूल, कळंबस्ते हायस्कूल, दाभोळे हायस्कूल, फुणगूस हायस्कूल, सोनवडे हायस्कूल, कोंडगाव हायस्कूल, ताम्हाणे हायस्कूल आणि केंद्रशाळा मारळ यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.