34138
जामसंडे जोशी विद्यामंदिरात
अंधश्रद्धेविरोधात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने जामसंडे येथील जोशी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत विद्यार्थी आणि पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
‘चमत्कार आणि विज्ञान’ या अनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिके सादर करून नागरिकांची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते, यावर प्रकाश टाकला. यामागे हातचलाखी असल्याचे सांगत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे यांनी, महिला बचतगट आणि इतर सामाजिक स्तरांवर अशाप्रकारच्या जनजागृतीची गरज व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापिका सुमेधा तेली, जगदीश गोगटे, राजश्री मोंडकर, सुधा घाडी, दिनेश दळवी, रघुनाथ बोडेकर, निकीता परब आदी उपस्थित होते.