कोकण

समुद्रकिनारी ‘समुद्री शेवाळ क्लस्टर’ उपयोगी

CD

समुद्रकिनारी ‘समुद्री शेवाळ क्लस्टर’ उपयोगी

डॉ. केतन चौधरी; मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये कार्यशाळा

सावंतवाडी, ता. २९ : समुद्र शेवाळ शेती ही सागरी मासेमारी आणि पर्यावरणपूरक असल्याने मोठ्या प्रमाणात या शेतीचा अवलंब झाल्यास पर्यावरणाचा समतोल राहिलच. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी समुद्री शेवाळ क्लस्टर उपयोगी ठरणारी आहेत. यातून आर्थिक आणि सामाजिक विकाससुद्धा होईल, त्याकरिता कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नेहमी तत्पर असतील, असे प्रतिपादन मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले.
‘समुद्र शेवाळ संवर्धन: सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळेत ते बोलत होते. कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि जलजीविका प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. यात ६७ लाभार्थी सहभागी झाले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा येथील संशोधक, वनविभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाचे, एन.जी.ओ. चे अधिकारी आणि कर्मचारी, मत्स्य शेतकरी, मत्स्य व्यवसायिक मच्छीमार, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पावसे, डॉ. केतन चौधरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर, जिल्हा समन्वयक सहयोगी प्रकल्प ऋषिकेश भाटकर, जलजीविका संस्थेचे जिल्हा समन्वयक चिन्मय दामले, वनरक्षक मिलिंद डाफळे उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी ‘समुद्र शेवाळ सिड बँक करीता नव्यानेच जाहीर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये तरतूद केल्याचे सांगितले. विक्री व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यांची व्यवस्थित सांगड घातली तर समुद्र शेवाळ शेती नक्की यशस्वी होईल, असे सांगितले.
----------
तज्ज्ञांचे उपयुक्त मार्गदर्शन
एनआयओ, गोवा येथील संशोधकांनी कोकण किनारपट्टीवरील विविध समुद्री प्रजातींची वाढ व लागवड तंत्रज्ञान याबाबत त्यांनी केलेला अभ्यास आणि अनुभव सांगितले. सिंधुदुर्ग येथील कांदळवन प्रतिष्ठानच्या पूजा लोटे यांनी प्रकल्प, सुविधांची माहिती दिली. गद्रे मरीनच्या प्रेरणा हिरवे यांनी त्यांच्या समुद्री शेवाळ शेतीबाबात अनुभव कथन केले. अक्षय जाधव, केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. वैभव मंत्री, डॉ. ए. यू. पागरकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

SCROLL FOR NEXT