-rat३०p२५.jpg-
26O34298
रत्नागिरी : डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात आयोजित कोश निर्मिती कार्यशाळेत सहभागी विशेषज्ञांसह पुढे बसलेले डावीकडून डॉ. निधी पटवर्धन, डॉ. शहजाद अन्सारी, डॉ. दिनकर मराठे व गायकवाड.
------
संस्कृत शब्दांना मराठी पर्याय
पाचदिवसीय कार्यशाळेत, सखोल चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षार्थी कोश निर्मिती ही पाचदिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली. वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. भारतातील ज्ञानपरंपरा आणि प्रथांची विद्यार्थ्यांसाठी परिभाषा-कोश (संस्कृत–मराठी) यामध्ये संस्कृत भाषेतील २३८७ शब्दांना मराठी भाषेतील अर्थपूर्ण शब्द शोधण्यात आले.
संस्कृतमधील शब्दांना मराठीतील शब्द शोधण्यासाठी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ. निधी पटवर्धन, प्रा. प्रज्ञा भट, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, संस्कृत अभ्यासिका अक्षया भागवत, बेंगळुरू येथील अगस्त्य गुरूकुलातील साहाय्यक आचार्या प्रा. पूर्वा चुनेकर, प्रकल्प साहाय्यक व संशोधिका प्रा. सई ओक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणकेंद्राचे समन्वयक स्वरूप काणे या सर्वांनी शब्दांवर सखोल व साधकबाधक चर्चा करत आणि भारतीय ज्ञानप्रणालीशी संबंधित शब्द शोधले.
हे शब्द वेद, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, कला, ज्योतिष, रसायनशास्त्र, साहित्य, स्थापत्यशास्त्र इत्यादी ४०हून अधिक विषयांशी संबंधित आहेत. कार्यशाळेत सहभागी विशेषज्ञांना विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.