कोकण

म्हाप्रळ-आंबेत नव्या पुलासाठी निधीची प्रतीक्षाच

CD

-rat३०p१५.jpg-
OP26O34266
मंडणगड ः म्हाप्रळ-आंबेत येथील जुना पूल. (संग्रहित)
------
म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी निधीची प्रतीक्षा
लोकप्रतिनिधींची फक्त घोषणाच; तीन वर्षे विलंब, नागरिकांत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत येथील नव्या पुलासाठी निधी मंजुरीची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून येथील नागरिक राज्यशासनाच्या घोषणेची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
मुंबई-पुणे या महत्त्वाच्या शहरांना दापोली व मंडणगड तालुक्यांशी जोडणाऱ्या मार्गावरील म्हाप्रळ-आंबेत पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्यायी नवीन पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह गोरेगाव व माणगाव तालुक्यातील नागरिकांकडूनही सातत्याने होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकारामुळे या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सुमारे १२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले होते आणि निधी मंजुरीसाठी प्रस्ताव अर्थविभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात केवळ निराशाच पदरी पडली आहे. नव्या पुलासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा अद्याप झालेली नाही.
दापोली मतदार संघात विविध विकासकामांवर हजारो कोटींचा खर्च सुरू असताना, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यावश्यक असलेल्या या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. म्हाप्रळ-आंबेत पूल हा केवळ विकासाचा विषय नसून, येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित निकडीची गरज आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी तरी निधी मंजुरीची घोषणा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
----
पुलाची दोनवेळा डागडुजी
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेला जुना पूल २०१७ ला निकामी झाला होता. त्यानंतर शासनाने या पुलाची दोनवेळा डागडुजी करून सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले. या दुरुस्तीनंतर पुलाचे आयुष्य दहा वर्षांनी वाढेल, असेही शासनाने स्पष्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT