कोकण

गाबीत वाड्यांचे लवकरच सर्वेक्षण

CD

34494

गाबीत वाड्यांचे लवकरच सर्वेक्षण

मालवण तहसीलदार; समाजाच्या प्रतिनिधींना ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : गाबीत समाजाच्या वस्त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच महसूल, भूमिअभिलेख, बंदर व मत्स्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांसह मालवण किनारपट्टीवर प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. याद्वारे गाबीत वाड्यांचे सर्वेक्षण करून सीमांकनाचा कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे आश्वासन तहसीलदार गणेश लव्हे यांनी गाबीत समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
गाबीत समाजाच्या वस्त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया स्थानिक समाजाला सोबत घेऊन वस्तुस्थितीदर्शक राबवावी, यासाठी गाबीत वस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी गाबीत फिशरमेन फेडरेशनतर्फे काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयात तहसीलदार लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली गाबीत समाज प्रतिनिधी, बंदर विभाग, भूमिअभिलेख विभाग व महसूल विभाग यांची संयुक्त बैठक झाली.
यावेळी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष बाबा मोंडकर, गाबीत समाज मालवणचे तालुकाध्यक्ष प्रमोद कोळंबकर, छोटू सावजी, बाबी जोगी, सुरेश बापर्डेकर, विकी चोपडेकर, संजय केळूसकर उपस्थित होते.
तहसीलदार लव्हे म्हणाले, ‘‘शासनाकडून प्राप्त आदेशानुसार कोकण किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांत कोळीवाडा सीमांकन करावयाचे आहे.’’ त्यावर बाबा मोंडकर यांनी स्पष्ट केले की, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आदेशानुसार ‘गाबीत वाडे’ व त्यांच्या ‘शेरे जमिनी’ यांचे सीमांकन आवश्यक आहे. या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्याचे मान्य केले.
------
मालवणमधूनच प्रारंभ करा!
भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांत प्रत्यक्ष भेटी देऊन गाबीत वाड्यांचे सीमांकन करावे व नकाशावर त्यांच्या नोंदी कराव्यात, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या. यासाठी महसूल, बंदर व मत्स्य विभागांचेही सहकार्य घेण्याचे सूचित केले. तालुक्यात गाबीत समाजाची वस्ती मोठी असल्याने सर्वेक्षणाची सुरुवात मालवणमधूनच करावी, जेणेकरून नंतर वेंगुर्ले व देवगड येथे ही प्रक्रिया राबविणे सुलभ होईल, असे प्रतिनिधींनी सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT