-rat३१p१८.jpg-
26O34555
रत्नागिरी : भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवानिमित्त मंगळवारी येथे पालखी मिरवणूक काढताना जैन बांधव पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात मिरवणुकीत भजन करताना जैन बंधू.
---------
भगवान महावीर जन्मकल्याण उत्साहात
रत्नागिरीत भव्य शोभायात्रा; अहिंसा-सत्याचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणाचा उत्सव रत्नागिरी शहरात भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघातर्फे जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवाने रत्नागिरीत धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
सत्य, अहिंसा अपरिग्रह आणि आत्मसंचय या तत्त्वांचा प्रसार करणाऱ्या भगवान महावीर यांचा यंदा २६२५वा जन्मकल्याण महोत्सव होता. या निमित्त सकाळी जैन मंदिरात अभिषेक, पूजन व प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महावीरांच्या अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह या तत्त्वांचे स्मरण केले. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंदिरातून शोभायात्रा सुरू झाली. रामआळी, राधाकृष्ण नाका, धनजीनाकामार्गे मारूतीआळीमार्गे परत जैन मंदिरात शोभायात्रा आणण्यात आली. या शोभायात्रेत आकर्षक रथ, धार्मिक देखावे आणि घोषवाक्यांमधून महावीरांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.
लहान मुलांनी व युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध ठिकाणी स्वागतकमानी उभारून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी समाजातील मान्यवरांनी महावीरांची शिकवण आजच्या काळात अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश समाजात रुजविण्याची गरज ज्येष्ठांनी व्यक्त केली. उत्सवानिमित्त अन्नदान व सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.