कोकण

अनधिकृत बांधकामे हटवून व्यापारी गाळे प्रकल्प

CD

34593

अनधिकृत बांधकामे हटवून व्यापारी गाळे प्रकल्प
कोकणनगर मार्गावरील प्रश्‍न; पालिका करणार दुकानदारांचे पुनर्वसन
रत्नागिरी, ता. ३१ : शहरातील कोकणनगर भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत दुकानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकणनगर मार्गावरील अनधिकृत शेड काढण्याची कारवाई सुरू करतानाच, येथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी नगरपालिका स्वतः व्यापारी गाळाचा प्रकल्प उभारणार आहे. बुधवारी ( ता. ३० ) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये याला एकमताने मंजुरी देण्यात आली. यामध्ये करदात्यांना प्राधान्य दिले जाणार असून, एका व्यावसायिकाला एकच गाळा दिला जाणार आहे.
रत्नागिरी पालिकेने दोन महिन्यांपूर्वी चर्मालय येथील अतिक्रमण हटवले होते; मात्र, कोकणनगर येथील सुमारे ७० ते ८० अनधिकृत दुकाने अद्यापही तशीच आहेत. विमानतळाच्या विविध यंत्रणांसाठी या ठिकाणी भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित असल्याने ही अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. दुकानदारांनी वेळ मागूनही स्वतःहून अतिक्रमणे न काढल्याने प्रशासनाने आता समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. या दुकानदारांचा उदरनिर्वाह याच व्यवसायांवर अवलंबून असल्याने, त्यांना अधिकृत गाळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाळेवाटपासाठी नियमितपणे घरपट्टी आणि मालमत्ता कर भरला आहे, अशांना प्राधान्य दिले जाणार आहे. या ठिकाणी ज्यांची एकापेक्षा जास्त दुकाने आहेत अशा मालकांना पालिकेकडून केवळ एकच गाळा भाडेतत्त्वावर दिला जाईल. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते आणि दुकानदार यांच्या बैठकीत एकमत झाले आहे. त्यामुळे कोकणनगर येथील अतिक्रमणे हटवण्याच्या प्रक्रियेला आणि गाळे बांधकामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. या निर्णयामुळे कोकणनगर भागातील वाहतुकीचा अडथळा दूर होईल आणि अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांना हक्काची आणि कायदेशीर जागा मिळेल.

चौकट
लवकरच पुन्हा कारवाई...
पालिकेच्या जागेत येते सुमारे ७० अनधिकृत दुकाने बांधली आहेत. यापूर्वी पालिकेने रितसर नोटिसा देऊन काही अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली होती. परंतु पक्की बांधकामे केलेल्या दुकानदारांनी पुढाकार घेत आम्ही स्वतःहून हटविण्यासाठी मुदत मागितली होती. त्यांना मुदत दिली, परंतु अद्याप ती हटविली नाहीत. त्यामुळे रितसर पोलिस बंदोबस्त घेऊन लवकरच अनधिकृत बांधकामे पुन्हा जमिनदोस्त केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT