कोकण

रत्नागिरी शहरात आता ''डीप क्लीन'' मोहीम

CD

रत्नागिरी शहरात आता
‘डीप क्लीन’ मोहीम
प्रभागनिहाय होणार स्वच्छता ; पालकमंत्री सामंत यांची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत लवकरच बदलण्यात येणार आहे. शहराच्या मुख्य चौकांचे सुशोभीकरण होत असतानाच, आता प्रभागनिहाय अंतर्गत स्वच्छतेवरही भर दिला जाणार आहे. शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच ''डीप क्लीन'' (मुळापासून स्वच्छता) ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आणि वाहने एकाच वेळी एकाच प्रभागात उतरून तो प्रभाग चकाचक करणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना असून ती लवकरच प्रत्यक्षात आणली जाणार आहे.
शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. मात्र, केवळ मुख्य रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण करून शहर सुंदर दिसत नाही, तर गल्लीबोळांतील स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते, ही बाब ओळखून उदय सामंत यांनी ही मोहीम आखली आहे. यात केवळ कचरा उचलणे एवढाच मर्यादित हेतू नसून, नालेसफाई, फूटपाथची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि साचलेल्या राडारोड्याची विल्हेवाट लावणे या गोष्टींचा समावेश असेल.
साधारणपणे स्वच्छता कर्मचारी वेगवेगळ्या प्रभागांत विभागलेले असतात, ज्यामुळे कामाचा वेग मर्यादित राहतो. मात्र, ''डीप क्लीन'' मोहिमेत पालिकेची संपूर्ण यंत्रणा एकाच प्रभागात केंद्रित केली जाईल. यामुळे अवघ्या काही तासांत तो प्रभाग पूर्णपणे स्वच्छ होईल. ही मोहीम लोकसहभागातून अधिक प्रभावी करण्याचा पालकमंत्र्यांचा मानस असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे रत्नागिरी शहर राज्यातील एक आदर्श ‘स्वच्छ आणि सुंदर’ शहर म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

चौकट
रत्नागिरीसाठी ४०० कोटींचा आराखडा
रत्नागिरी शहराचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ४०० कोटींच्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २०० कोटींच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उर्वरित २०० कोटी रुपये शहराच्या भुयारी गटार योजनेवर खर्च केले जाणार आहेत. यामुळे शहराचा आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT