कोकण

चिपळूण ः कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित

CD

६५ वर्षांनंतरही पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न प्रलंबितच
कोयना प्रकल्पग्रस्त ; जनजागरतर्फे कोळकेवाडीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : कोयना प्रकल्पामुळे १९६० पासून चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी, पोफळी, नागावे, अलोरे, पेढांबे आणि पिंपळी या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, सहा दशकांनंतरही प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. रोजगार, पुनर्वसन आणि नागरी सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबितच आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता ‘जनजागर प्रतिष्ठान’ने पुढाकार घेतला आहे.
भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनजागर प्रतिष्ठानने कोळकेवाडी येथे प्रकल्पग्रस्तांची प्राथमिक बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी पूर्वीच्या नेत्यांनी हे प्रश्न अर्धवट सोडल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. आता या प्रश्नांचा शेवटपर्यंत पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या बैठकीला जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख, कोकण संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, शरद शिंदे, अलोरेचे माजी सरपंच प्रकाश मोहिते, अनंत बोलाडे, मोहन कदम, जयवंत शिंदे आदी उपस्थित होते. अनेक वर्षांच्या फसवणुकीमुळे नाराज झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता नव्याने एकत्र येण्याचे आवाहन दिलीप गायकवाड यांनी केले.

चौकट
अलोरेत होणार महामेळावा
पंचक्रोशीतील सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून हे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून येत्या काही दिवसांत अलोरे येथे प्रकल्पग्रस्तांचा एक मोठा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती माजी सरपंच प्रकाश मोहिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT