कोकण

भालावलमध्ये ‘समूह शेती’तून फुलली नाचणी

CD

34707

भालावलमध्ये ‘समूह शेती’तून फुलली नाचणी

ग्रामपंचायतीचे प्रोत्साहन; सुधारित पद्धतींचा अवलंब फायद्याचा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ : ग्रामीण भागातील शेतीविकासाला चालना देण्यासाठी भालावल ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां’तर्गत ‘समूह शेती’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक व सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. या योजनेंतर्गत गावात नाचणी पिकाची सामूहिक लागवड करण्यात आली आहे.
या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीने अनुदानाच्या माध्यमातून सुधारित बियाणे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या उपक्रमाचा दीर्घकालीन विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या लागवड केलेल्या सुधारित बियाणांपासून पुढील हंगामात अधिक बियाणे तयार करून, ते उर्वरित शेतकऱ्यांना ‘भेट’ स्वरुपात वितरित करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात सुधारित बियाणांचा प्रसार होऊन शेतीची गुणवत्ता उंचावण्यास हातभार लागणार आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतीत नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
----
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश!
ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी सांगितले की, समूह शेतीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून, एकत्रित शेती केल्याने उत्पादनक्षमता वाढण्याची मोठी संधी निर्माण होते. सुधारित बियाणांचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरपंच समीर परब म्हणाले, ‘‘सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.’’

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT