rat1p1.jpg -
34637
प्रभानवल्ली - येथील बल्लाळ गणेश देवस्थानच्या स्टोअर रूमवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले.
पावसामुळे प्रभानवल्लीत स्टोअर रूमचे नुकसान
लांजा, ता. १ : गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने लांजा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या वादळी पावसाचा मोठा फटका तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानला बसला असून, देवस्थानच्या स्टोअर रूमचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
तालुक्यात दि. २६ आणि २७ मार्च रोजी वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानच्या साठवणूक कक्षाचे (स्टोअर रूम) पत्रे जोरदार वाऱ्यामुळे हवेत उडून गेले. यामुळे स्टोअर रूममधील साहित्याचेही नुकसान झाले असून, देवस्थानचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अवकाळी संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
------
हेगशेट्ये महाविद्यालयात
एस. एम. जोशींना अभिवादन
रत्नागिरी, ता. १ : थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एस. एम. जोशी विद्यानिकेतन शैक्षणिक परिसरातील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणातील एस. एम. जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्राचार्य डॉ. संजय गवाळे व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी आपल्या मनोगतात एस. एम. जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील योगदानाचा आढावा घेतला. "आपल्या शैक्षणिक संकुलाला एस. एम. जोशी यांचे नाव लाभले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्श जीवनकार्याविषयी सखोल वाचन करावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.