कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट रत्नागिरीत
कला क्षेत्रात करिअरच्या संधी ः सुहास भोळे यांची उपस्थिती
रत्नागिरी, ता. १ : कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने, उज्ज्वल शिक्षण मंडळ संचलित ‘आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट’ या महाविद्यालयाचे उद्घाटन आज झाले. ज्येष्ठ रंगकर्मी व हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कला शिक्षणाकडे केवळ छंद म्हणून न पाहता, त्यातील करिअरच्या असंख्य संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. कोकण विभागात गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित कला शिक्षण विकसित करण्यासाठी हे महाविद्यालय कटिबद्ध आहे. ग्राफिक डिझाईन आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन, काळाशी सुसंगत आणि अद्ययावत अभ्यासक्रम येथे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कुशलता आणि कलात्मक जाण यांचा मेळ घालून त्यांना स्वावलंबी व कुशल ‘ग्राफिक डिझाईनर’ बनविणे, हे संस्थेचे ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांच्या संकल्पनेतून हे महाविद्यालय साकारले आहे. उद्घाटनप्रसंगी विनायक हातखंबकर, अॅड. महेंद्र मांडवकर, अॅड. राकेश सत्वे, नंदकुमार यादव, प्रा. पद्मजा पाटणकर, उदय शिंदे, महेंद्र सागवेकर, नीलिमा शिंदे, संतोष गोरीवले, नम्रता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.