‘दापोली अर्बन’ला ८.४४ कोटी नफा
डॉ. जालगावकर ः ठेवींमध्ये ७३ कोटींची वाढ
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ : दापोली अर्बन बँकेने आर्थिक वर्षात ८ कोटी ४४ लाखांचा नफा मिळवला आहे. ३१ मार्चअखेर बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांची पूर्तता केल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी दिली.
आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये ७३ कोटींची वाढ झाली असून ५०० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडत एकूण ठेवी ५२६ कोटी ९१ लाखांवर पोहोचल्या आहेत. त्याचप्रमाणे एकूण कर्जवाटप ३४३ कोटी ५६ लाख इतके झाले असून एकूण व्यवसाय ८७० कोटी ४७ लाख इतका झाला आहे.
सभासदांसाठी दोन लाखांचा अपघात विमा, तर ५० हजारांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांसाठी पाच लाखांचा विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी बँकेने अनुक्रमे २७.५२ लाख व १४.८३ लाख खर्च केला आहे. कमी भागभांडवल असलेल्या सभासदांनी किमान एक हजारपर्यंत भाग पूर्ण करावा तसेच ठेवी वाढवून विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. बदलत्या बँकिंग नियमनामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले असून बँकेने आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याबरोबरच पाच कोटींचा सायबर विमा उतरवून ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.