कोकण

‘एप्रिल फूल’ दिनी झाडांना केले ‘कूल’

CD

34759

‘एप्रिल फूल’दिनी झाडांना केले ‘कूल’

घारपी शाळेत उपक्रम; विद्यार्थ्यांकडून वृक्षसंवर्धनाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः ‘एप्रिल फूल’ म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते; मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा ‘एप्रिल फूल’ दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि निसर्गप्रेमी पद्धतीने साजरा केला. कुणालाही फसवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी घातले, त्यांच्या भोवतालची सफाई केली आणि झाडांचे संवर्धन करण्याचा सुंदर संदेश दिला.
उन्हाच्या कडक झळांनी त्रस्त झालेल्या झाडांना विद्यार्थ्यांनी जणू प्रेमाचा थंडावा दिला. छोट्या हातांनी झाडांच्या मुळाशी पाणी घालताना, त्यांच्याभोवती साचलेला कचरा हटवताना विद्यार्थ्यांच्या मनातील निसर्गाविषयीची आपुलकी स्पष्टपणे दिसून आली.
‘एप्रिल फूल’च्या दिवशी खोड्या करण्यापेक्षा एखादे चांगले काम करूनही आनंद मिळू शकतो, हा संदेश विद्यार्थ्यांनी कृतीतून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात केवळ हिरवळच वाढली नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनातही पर्यावरण संवर्धनाची बीजे रुजली.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, ‘झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून आपल्या जीवनाचा श्वास आहेत. विद्यार्थ्यांनी झाडांची काळजी घेऊन ‘एप्रिल फूल’ला एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वळण दिले आहे. अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये संवेदनशीलता, जबाबदारी आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते.’
या उपक्रमासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांचे तसेच अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविता आणि संजना सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या छोट्याशा पण हृदयस्पर्शी कृतीमुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि प्रसन्न दिसू लागला. ‘एप्रिल फूल’च्या दिवशी खोड्यांऐवजी झाडांना प्रेम देणाऱ्या या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने निसर्गाशी मैत्री केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT