rat२p८.jpg-
२६O३४८७८
राजापूर ः ब्रिटिशांनी बांधलेले सायबाचे धरण.
rat२p९.jpg-
P२६O३४८७९
राजापूर ः धरण बांधलेल्याची माहिती देणारा शिलालेख.
राजापूर पालिकेची १५० वर्षे--------मालिका भाग ३
ब्रिटिशांच्या दूरदृष्टीमुळे कोडवली धरण उभारणी
१९व्या शतकात नागरी सुविधा; राजापुरात नळाद्वारे पाणी
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे कोकणातील एक प्राचीन व ऐतिहासिक नगर असून, १९व्या शतकात येथे आधुनिक नागरी सुविधांची पायाभरणी झाली. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहरातील नळाद्वारे पाणीपुरवठा योजना. या योजनेला त्या काळातील प्रगत नागरी विकासाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून १०० वर्षांनंतरही सांगता येते, अशी माहिती इतिहास अभ्यासक धनंजय मराठे यानी दिली.
राजापूर पालिकेला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अभ्यास करताना अनेक गोष्टी हाती लागल्या सांगून मराठे म्हणाले की, राजापूर शहरात त्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रकर्षाने जाणवत होती. स्थानिक विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत अपुरे ठरत होते. यामुळे नियोजित आणि शाश्वत पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर कोदवली परिसरात धरण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजापूर तालुक्यातील कोदवली येथे उभारण्यात आलेले धरण हे दगडी (masonry) स्वरूपाचे असून, त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. या धरणाची लांबी सुमारे १३० फूट आणि उंची सुमारे १७.५ फूट असून, त्यामध्ये सुमारे ६ कोटी गॅलन पाणी साठवण्याची क्षमता होती. या धरणामुळे वर्षभरासाठी पुरेसा जलसाठा निर्माण करण्यात यश आले हे महत्त्वाचे याकडे मराठे यांनी लक्ष वेधले. या धरणातून साठवलेले पाणी पाइपद्वारे राजापूर शहरात आणण्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये जलसाठा, वाहतूक आणि वितरण यांचा समन्वय साधणारी प्रणाली उभारण्यात आली होती. शहरात साठवण टाक्या उभारून तेथून नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. ही संपूर्ण प्रणाली त्या काळातील आधुनिक जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राजापूर नगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत होती, असेही मराठे यांनी सांगितले.
( समाप्त)
----
नगरपालिकेच्या माध्यमातून
१८७६ मध्ये स्थापन झालेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्या काळात नगरपालिका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या एटीएटी क्रॉफर्ड यांच्या अध्यक्षतेखाली या पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी पूर्णत्वास नेण्यात आली.
----
लोकसहभातून खर्च
या प्रकल्पासाठी लागणारा खर्च सुमारे ३० हजार रुपयांच्या आसपास होता, जो त्या काळात मोठ्या प्रमाणात मानला जात होता. या खर्चाचा काही भाग स्थानिक लोकसहभागातून उभारण्यात आला तर उर्वरित रक्कम कर्जाच्या स्वरूपात उभी करण्यात आली. यामुळे ही योजना केवळ शासकीय उपक्रम न राहता स्थानिक समाजाच्या सहभागातून साकारलेली नागरी विकासाची एक यशस्वी योजना ठरली.
------
ही आहेत वैशिष्ट्ये
* योजनेमुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली
* सार्वजनिक आरोग्यातही झाली सुधारणा
* नागरी जीवनमान उंचावण्यास कारणीभूत
* लोकसहभागातून उभारलेले आदर्श विकासकाम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.