swt29.jpg
34885
मालवण : पावसामुळे निसरडा बनलेला रस्ता आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने साफ करून वाहतुकीसाठी सुरळीत केला.
मालवणात अवकाळीमुळे तारांबळ
अचानक पाऊस : रस्ता निसरडा झाल्याने अपघात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : शहरात आज सकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. रस्ता निसरडा झाल्याने किरकोळ अपघातही घडले.
या पावसाचा मोठा फटका शहरातील वायरी मुख्य रस्त्याला बसला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रिंगीच्या झाडांची फळे पावसामुळे रस्त्यावर पडली होती. वाहनांच्या वर्दळीमुळे या फळांच्या कचरा, चिखल आणि फेस तयार झाल्याने संपूर्ण रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. परिणामी, दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.
रस्त्यावरून वाहने घसरत असल्याचे आणि मोठा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास येताच मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी तातडीने सूत्रे हलवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, कामात विलंब होऊ नये म्हणून सभापतींनी स्वतःची वाहनेही साफसफाईच्या कामासाठी उपलब्ध करून दिली.
आरोग्य सभापतींच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. स्वच्छता निरीक्षक श्री. पवार, मुकादम श्री. वळंजू, आरोग्य कर्मचारी वैभव वळंजू आणि इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भर पावसात रस्ता साफ करून वाहतुकीसाठी सुरक्षित केला. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. भर पावसात आणि धोकादायक परिस्थितीत आरोग्य विभागाने दाखवलेली कार्यतत्परता आणि आरोग्य सभापतींच्या संवेदनशील भूमिकेबद्दल मालवणच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोट
रस्त्यावर फळांच्या कचऱ्याचा फेस झाल्याने अपघात होत होते. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने आरोग्य विभागाला तत्काळ पाचारण करण्यात आले. कर्मचाऱ्यांनीही पावसात उत्तम सहकार्य केले.
- पूनम चव्हाण, आरोग्य सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.