

Arya Avdhut Shines Nationally, Wins Prestigious Beauty Title for Nagpur
sakal
नागपूर: नागपूरच्या आर्या अवधूत हिने सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीयस्तरावर मोठे यश मिळवले आहे. ‘इंडिया मिस टीजीपीसी-१४’ या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत आर्याने प्रथम स्थान पटकावत यंदाचा ‘इंडियाज मिस टीजीपीसी’ अवार्ड आपल्या नावावर केला आहे. तिच्या या यशामुळे नागपूरसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.