कोकण

संदेश उर्फ गोट्या सावंत वाढदिवस

CD

जाहिरात लेख

पुरवणी डोके : मा. संदेश उर्फ गोट्या सावंत वाढदिवस विशेष

टीपः swt216.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
संदेश सावंत
संदेश सावंत
टीपः swt217.jpg मध्ये फोटो आहे.
34929
संदेश उर्फ गोट्या सावंत हे आपल्या पत्नी संजना यांच्या समवेत.
टीपः swt218.jpg
34931
संदेश सावंत यांच्या ''युवा प्रतिष्ठान''तर्फे घेतल्या जाणाऱ्या ''सिंधुरत्न टॅलेंट सर्च'' परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते लॅपटॉप वितरण करण्यात आले.
टीपः swt219.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
34932
खासदार नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संदेश सावंत आणि त्यांच्या पत्नी संजना सावंत.

सह्याद्रीचा बुलंद आवाज

लीड
''सह्याद्रीचा ढाण्या वाघ'' तथा ''सह्याद्रीचा बुलंद आवाज'' अशी स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा होत आहे. गेली तीस वर्षे त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा सर्वच क्षेत्रांत आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल...
...................
समाजकारणाची आवड असणारे संदेश सावंत यांचे नेतृत्व विद्यार्थी दशेतच उदयाला आले. चांगल्याशी चांगले तर कुणी अन्याय करत असेल तर त्याविरोधात दणदणीत आवाज उठवून अन्यायाचा बिमोड करणे हा संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा खाक्या! तळागाळातील जनतेची कामे प्राधान्याने व्हावीत, त्यांना न्याय मिळावा, यासाठी नेहमीच तत्पर असल्याने श्री. सावंत हे अल्पावधीतच सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून उदयास आले.
तत्कालीन शिवसेनेतील शाखाप्रमुख ते भाजपचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष अशी महत्त्वाची राजकीय पदे श्री. सावंत यांनी भूषवली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचीही धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली. पद असो वा नसो, प्रत्येक गावात सक्षम नळपाणी योजना, चांगल्या दर्जाचे रस्ते, वीज व्यवस्था व्हावी, यासाठीही त्यांनी आग्रही भूमिका घेतली, नव्हे तर ही कामे करून दाखवली. कणकवली रेल्वे स्थानक ते नरडवे गावापर्यंत तब्बल ३२ किलोमीटर लांबीचा रस्ता त्यांनी एकाच वेळी डांबरीकरण आणि दुपदरीकरण करून घेतला. जिल्हा प्रशासनावरही त्यांची पकड असल्याने आजवर आपल्या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणला आहे.
त्यांच्या मतदारसंघात कुठलीही आपत्ती येवो अथवा कुणावरही कसलेही संकट येवो, ते संकट निवारण्यासाठी दुसऱ्या क्षणी संदेश सावंत तेथे पोहोचलेले असतात. त्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंत यांचा आदर्श घेऊन अनेक युवक, तरुण मंडळी समाजामध्ये काम करत आहेत. ''देऊ तो शब्द पूर्ण करू'' हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य. याच गुणामुळे त्यांनी गावागावात विकासाची गंगा आणली.
......................
राजकारणातील ''किंगमेकर''
संदेश सावंत हे कुठल्याही मतदारसंघात गेले तरी ते तेथील सामान्य जनतेची कामे करण्याला आधी प्राधान्य देतात. त्यामुळेच नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघ असो अथवा कणकवली शहरालगतचा कलमठ मतदारसंघ असो, या दोन्ही मतदारसंघात सावंत यांनी विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास रचला. त्यामुळेच आजवर राजकारणात कोणाचीही लाट असो अथवा नसो, गोट्या सावंत यांचा विजय हा निश्चित असतो. २०१८ मध्ये कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष विरोधात इतर सर्व राजकीय पक्ष अशी लढत होती. त्यामुळे या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. श्री. सावंत यांनी सर्व १७ प्रभाग पिंजून काढले. मायक्रो प्लॅनिंग केले आणि एकूण १७ पैकी ११ स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि नगराध्यक्षही निवडून आणून दाखवला. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उभे होते. त्यावेळी सर्वात कठीण अशा राजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आली. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाची प्रचंड ताकद असतानाही, या मतदारसंघात राणेंना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूकही सावंत यांच्या अचूक नियोजनामुळे एकतर्फी झाली आणि नीतेश राणे हे एक लाखापेक्षा अधिक मते मिळविण्यात यशस्वी झाले. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत संदेश सावंत यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल ५ हजार १९३ मताधिक्याने पराभव करून सिंधुदुर्गात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम करून दाखवला.
....................
शैक्षणिक क्षेत्रात ठसा
राजकारणात नेहमीच ''किंगमेकर'' असणाऱ्या संदेश सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या ''युवा संदेश प्रतिष्ठान''च्या माध्यमातून ते दरवर्षी अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलत आहेत. युवा संदेश प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत दरवर्षी सिंधुदुर्गातील हजारो विद्यार्थी सहभागी होत आहेत.
दहावी, बारावी परीक्षेत गेली बारा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात अव्वल लागत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे युवा संदेश प्रतिष्ठानची गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती सराव परीक्षा देखील आहे. या परीक्षेसोबतच दरवर्षी निबंध, चित्रकला आणि इतर शालेय स्पर्धा आणि उपक्रम देखील सातत्याने घेतले जात आहेत. एवढेच नव्हे, तर दरवर्षी ते जिल्ह्यातील शंभर मुलांना विमान प्रवास घडवून त्यांची ''इस्रो''ची शैक्षणिक सहल घडवून आणत आहेत.
......................
विकासकामांचा धडाका
राज्याचे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी प्रत्येक पंचक्रोशीला एक लघु धरण मंजूर केले होते. ही धरणे पूर्णत्वासाठी संदेश सावंत आजही मेहनत घेत आहेत. यात सावडाव आणि नाटळ राजवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी मिळवून आणली असून या धरणांची कामे प्रगतीपथावर आहेत. तरंदळे धरण प्रकल्प पूर्णत्वास गेला असून या धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याचे काम सुरू झाले आहे. नरडवे धरणासाठी वाढीव आर्थिक पॅकेज त्यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणले. त्यामुळे नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. आता वागदे, जानवली हे धरण प्रकल्प पूर्णत्वासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. संदेश सावंत यांच्या आजवरच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा संजना सावंत यांनीही खंबीर साथ दिली आहे.
....................
महिला सक्षमीकरणासाठीही उपक्रम
संदेश सावंत आणि त्यांच्या सौभाग्यवती संजना सावंत यांनी युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठीही सातत्याने उपक्रम सुरू ठेवले आहेत. यात दरवर्षी प्रतिष्ठानमार्फत महिलांसाठी हस्तकला आणि इतर साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर बचतगटांतील महिलांसाठी सातत्याने रोजगाराभिमुख उपक्रम राबविले जात आहेत.
ज्येष्ठांसाठी सातत्याने आरोग्य शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांना योग्य ते उपचार मिळावेत, त्यांना मोफत औषधोपचार मिळावा, यासाठीही युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. यात ज्येष्ठांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जातात. त्याचप्रमाणे सातत्याने मोफत मोतिबिंदू शिबिर आयोजित करून अनेक ज्येष्ठांना नवी दृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर, अष्टविनायक आदींची तीर्थयात्राही ते सातत्याने घडवून आणत आहेत.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT