कोकण

भाजप कार्यालयाचे उद्या उद्‍घाटन

CD

भाजप कार्यालयाचे
उद्या उद्‍घाटन
मंडणगड ः भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगडचे शहरातील कार्यालयाचे उद्‍घाटन ४ एप्रिल रोजी होणार आहे. हे कार्यालय सिटीप्राईड बिल्डिंग एसटी बसस्थानकाशेजारी आहे. या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे हे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमास पार्टीचे वरिष्ठ स्तरावरील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष दत्ताराम महाडीक यांनी केले आहे.
------
ॲथलेटिक्स निपुणता
चाचणी ९ रोजी
रत्नागिरी ः राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता सद्यःस्थितीत ॲथलेटिक्स या खेळांकरिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील केंद्र हे अनिवासी केंद्र आहे. जिल्हास्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन ९ एप्रिलला सकाळी ८ वा. एसव्हीजेसीटी क्रीडासंकूल, डेरवण, सावर्डे, ता. चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/१FAlpQLSelLZpEpNKZSHvAoZ-६TX१xcgwf_७x-qfmB_A९_Z२aWlaPbSJw/viewform०usp=header या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त इच्छुक खेळाडूंना निवड चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळातील अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

महिन्यात विशेष
डिजिटल शेतीशाळा
रत्नागिरी ः हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शेतीचा वाढता खर्च यावर मात करण्यासाठी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’अंतर्गत जिल्ह्यात विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची दुसरी शेतीशाळा ८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामध्ये जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन, ज्यामध्ये बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व त्यांच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच १५ एप्रिलला तिसरी शेतीशाळा पार पडेल, ज्याचा मुख्य विषय ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ हा असेल. यामध्ये सापळा पिके, पक्षीथांबे, चिकट सापळे, मित्रकीटकांचे संवर्धन आणि अर्कांचा वापर यावर भर दिला जाईल. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात २२ एप्रिलला चौथी शेतीशाळा आयोजित केली असून, यात भातशेतीसाठी सुधारित लागवड तंत्र, भाताची थेट पेरणी (DSR), ''श्री'' पद्धत आणि भात लावणीसाठीच्या यांत्रिकी पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT