DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

Delhi Capitals vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी, रियान पराग यांनी आक्रमक खेळत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली सुरुवात दिली होती. ध्रुव जुरेलनेही अर्धशतक केले. पण मिचेल स्टार्कने अफलातून गोलंदाजीने राजस्थानला २०० धावांच्या आतच रोखले.
Dhruv Jurel - Vaibhav Sooryavanshi | PBKS vs RCB | IPL 2026

Dhruv Jurel - Vaibhav Sooryavanshi | DC vs RR| IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, DC vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रविवारी (१७ मे) अरुण जेटली स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) आणि कर्णधार रियान पराग (Riyan Parag) यांनी आक्रमक खेळ केला.

पण मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) त्याच्या शानदार गोलंदाजीने दिल्लीला पुनरागमन करून दिले. त्यामुळे राजस्थानला चांगल्या सुरुवातीनंतरही २०० धावा करता आल्या नाहीत. त्यांनी आता दिल्लीसमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजयाची गरज आहे. तर राजस्थानलाही प्लेऑफच्या शर्यतीतील समीकरण सोपं ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.

Dhruv Jurel - Vaibhav Sooryavanshi | PBKS vs RCB | IPL 2026
PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com