

BMC Bakrid rule
ESakal
आगामी बकरीद (ईद-उल-अजहा) सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमैया यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, त्यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून निवासी भागांमध्ये होणारी जनावरांची अवैध कत्तल थांबवण्याची मागणी केली आहे.