swt226.jpg
34998
सावंतवाडी ः श्री एकमुखी दत्त मंदिर येथे कलशारोहण सोहळा पार पडला.
सावंतवाडीत ‘दिगंबरा’चा नामघोष
कलशारोहण उत्साहात ः एकमुखी दत्त मंदिरात सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्षे पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात झाला.
श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर, शरद जोशी महाराज, दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी) आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते कलशपूजन व कलशारोहण सोहळा झाला. गेले तीन दिवस हा सोहळा होत असून विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत आहे. आज सकाळी शतकलशार्चन, शतकलशाभिषेक, स्थापित देवतांवर अभिषेक आदी धार्मिक विधी झाले. शकत कलशाभिषेकाचा मान १०० जोडप्यांना देण्यात आला. यानंतर दुपारी १२ वाजता कलशारोहण करण्यात आले. गेल्या ४ वर्षांपासून मंदिराचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले असून आज कलशारोहण करण्यात आले.
यावेळी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे, सदस्य दीपक पटेकर, अमेय पै, जितेंद्र पंडित, बबलू तळवणेकर, लतिका सिंग, विनायक परडाकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत, विलास गोवेकर, श्री. विर्नोडकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती आनंद नेवगी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.