KOP२६O३५१३५
स्वावलंबन योजनेतून ६५ विहिरी पूर्ण
पाण्याचा प्रश्न लागला मार्गी ; रब्बी, उन्हाळी हंगामात पिके घेणे शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यात ६५ विहिरी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे तसेच भातपिकांबरोबरच रब्बी, उन्हाळी हंगामात पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे. या योजनेत निवड केलेल्या १३९ लाभार्थ्यांपैकी ८१ जणांना विहीर बांधण्याचे आदेश दिले होते. त्यातील ७३ कामे सुरू झाली असून, ६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.
स्वावलंबन योजनेतून आतापर्यंत २ कोटी ८१ लाखांचा निधी खर्च झाला असून, १० लाखांचा निधी शिल्लक आहे. ही योजना कोकणातील शेतकऱ्यांची आधार बनली आहे. कृषी स्वावलंबन ही योजना २०२४-२५ अंतर्गत सिंचन विहिरीची उपलब्धता झाल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन सकारात्मकता परिणाम दिसून येत आहे. कोकण विभागाची भौगोलिक रचना, डोंगराळ प्रदेश, लाल माती तसेच अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात घेतल्यास येथे शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून राहिलेली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडते; मात्र पाणी साठवणुकीअभावी वाहून जाते. पुढे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते त्यामुळे शेतकरी केवळ भातपिकावरच अवलंबून राहतो. रब्बी, उन्हाळी हंगामात शेती करणे कठीण जात होते. त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी राहून उत्पन्न मर्यादित होते. या योजनेमुळे विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनाची सुविधा मिळू लागली आहे. भातपिकांनंतर जमीन पडीक न ठेवता रब्बी, उन्हाळी हंगामात विविध पिके घेणे शक्य झाले आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, सुपारीसारख्या फळबांगाना योग्य वेळी पाणी देणे शक्य झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ झाली आहे. भाजीपाला पिके, मसालापिके तसेच नगदी पिके घेण्याची संधी निर्माण झाल्याामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
चौकट
योजनेचा असा आहे उद्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जाती (एससी) आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठीची प्रमुख योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवून त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती स्वावलंबी बनवणे हा आहे. नवीन विहिरीसाठी ४ लाख, जुन्या विहिरीवर दुरुस्तीसाठी १ लाख आणि शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी २ लाख रुपये अनुदान मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.