धामापूरला आजपासून
खुल्या क्रिकेट स्पर्धा
कुडाळ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंडळ धामापूर (ता. मालवण) यांच्या वतीने खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ४ ते ६ एप्रिल या कालावधीत धामापूर डॉ. आंबेडकरनगर येथील समाजमंदिर नजीकच्या मैदानात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम १० हजार २६ रुपये व चषक, द्वितीय ५ हजार २६ रुपये व चषक, याशिवाय उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर अशा वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येईल. इच्छुक संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी शैलेश धामापूरकर, संदेश धामापूरकर, स्वप्नील नाईक व अविनाश नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
.....................
रुग्ण हक्कसंदर्भात
रविवारी बैठक
सावंतवाडी ः रुग्ण हक्कासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (ता. ५) दुपारी ३ वाजता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली आहे. साथी संस्थेच्या सुनीता गांधी आरोग्य व्यवस्थेसंदर्भांत सावंतवाडी येथे केलेला सर्व्हे, रुग्णांचे हक्क, आरोग्य विभागाने देण्याचा टोल फ्री क्रमांक, ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना सदस्य, आरोग्य प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, शासकीय, खासगी आणि ट्रस्ट हॉस्पिटलसंबंधी समस्या असलेले नागरिक आणि यासंबधी काम करू इच्छिणाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे राजू केळूसकर यांनी केले आहे.
......................
ओटवणेत सोमवारी
दशावतार नाट्यप्रयोग
ओटवणे : जाधववाडी तसेच जयभिम युवक कला क्रीडा मंडळ जाधववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.६) रात्री ९ वाजता जाधववाडी येथे देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांचा ‘व्यंकट रमणा जय गोविंदा’ अर्थात महिमा तिरुपती बालाजीचा हा ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. याचा नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जाधववाडी, जयभीम युवक कला क्रीडा मंडळ आणि बाळा रामा जाधव यांनी केले आहे.
---
सातार्डा दशक्रोशीत
पावसामुळे तारांबळ
सावंतवाडी ः सातार्डा दशक्रोशीमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले. सध्या अनेक ठिकाणी छप्पर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. काम आटोपून घरी परतणारे दुचाकीस्वार, घरी परतण्यासाठी स्टॉपवर थांबलेले प्रवासीही पावसात भिजून चिंब झाले. अचानक पाऊस पडल्याने घराच्या छप्पर दुरुस्तीचे काम थांबले.
-----
कवठणीत रविवारी
‘मार्जार’ नाट्यप्रयोग
सावंतवाडी ः कवठणी येथील श्री देव आपटेश्वर रंगमंच येथे रविवारी (ता. ५) रात्री ९.३० वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘मार्जार’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कवठणी ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.