कोकण

स्वप्ना यादव यांना ''बेस्ट सीईओ'' पुरस्कार

CD

- rat३p७.jpg-
P26O35134
स्वप्ना यादव

स्वप्ना यादव यांचा राज्यस्तरीय गौरव
‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार प्रदान ; चिपळूण नागरी पतसंस्था
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई यांच्यावतीने प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहकार चळवळीत महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्कृष्ट कार्याचा आदर्श निर्माण करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आज कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यादव यांचा २००२ मध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेत अत्यंत सामान्य स्तरावरून प्रवास सुरू झाला. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांची ‘व्यवस्थापक (प्रशासन)’ पदावर बढती झाली. त्यानंतर एप्रिल २०१४ मध्ये ‘सरव्यवस्थापक’ आणि जुलै २०१७ पासून ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून त्यांनी संस्थेची धुरा अत्यंत समर्थपणे पेलली आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या कन्या असलेल्या यादव यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
यादव यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने रत्नागिरी जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विस्तार केला असून, आज संस्थेच्या ५० शाखा कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात आर्थिक शिस्त, ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शक व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर भर दिला. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच संस्था आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यादव यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT