Chhagan Bhujbal Says Maharashtra Has Only One Month Fuel Stock
esakal
अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेल नसल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता चांगलीच खळबळ उडाली आहे.