कोकण

गोगटेत पदवीदान समारंभ

CD

‘गोगटे’त आज
पदवीदान समारंभ
रत्नागिरी ः गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवारी (ता. ४) सकाळी ११ वा. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून मार्च/एप्रिल २०२५ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विद्यापिठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. उर्वरित पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी वितरणाची व्यवस्था महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
मार्च/एप्रिल २०२५ मध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख व वेळ निश्चित झाल्यावर कळवण्यात येईल.

आदित्य जाधवची
अॅथलेटिक्समध्ये निवड
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आकले येथील मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेचा गुणवंत खेळाडू आदित्य जाधव याची ३री भारतीय सबज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६-२७ साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे होणार असून, त्याची ५ किलोमीटर चालणे या प्रकारात निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष बळीराम शिंदे, उपाध्यक्ष नरसिंग शिंदे, सचिव अविनाश जागुष्टे, खजिनदार कौस्तुभ जागुष्टे, हिशोब तपासणी विजय टाकळे तसेच सर्व संचालक मंडळाने आदित्यचे अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजू वाघमारे, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘ओबीसीं’साठी
स्वतंत्र कॉलम करा
खेड ः देशातील ओबीसी समाजाला सातत्याने दुर्लक्षित करण्याचे धोरण आता सहन केले जाणार नाही, असा इशारा देत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तत्काळ जाहीर करावी. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या खेड शाखेने, ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीने तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन दिले. या वेळी कुणबी समाजोन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, ओबीसी- व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक शिगवण, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, रामचंद्र आईनकर, भिकू जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT