कोकण

नातूवाडी धरणामुळे कोकणात दुबार शेती

CD

-rat3p11.jpg-
26O35138
खेड ः मुगाच्या शेतात काम करताना पांडुरंग हंबीर आणि कुटुंबीय.
------
दुबार पिकामुळे १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
नातूवाडी धरणाचा फायदा; उन्हाळ्यात कडधान्य, भाताची फेरलागवड
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : कोकणात बहुतांश ठिकाणी पावसावर आधारित भातशेती प्राधान्याने केली जाते; मात्र त्याला अपवाद खेड येथील नातूनगर धरणाच्या सिंचन क्षेत्रातील गावे ठरत आहेत. या धरणाचे पाणी शेतीसाठी उन्हाळ्यातही उपलब्ध होत असल्याने भुईमूग व भात लागवड उन्हाळ्यातदेखील केली जात आहे. दुबार पीक मिळत असल्याने येथील काही शेतकरी आता व्यावसायिक शेतीकडे वळत आहेत. सद्यःस्थितीत १५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
कोकणातील शेती ही प्रामुख्याने दोन पद्धतीत केली जाते. त्यामध्ये बागायतीमध्ये आंबा, काजू, नारळ, पोफळी यांची लागवड केली जाते तर तृणधान्यामध्ये भात, नाचणी, वरी तर कडधान्यामध्ये चवळी, मूग, उडीद, पावटा, तूर, भुईमूग आदींचा समावेश होतो. नातूवाडी धरणाचे दोन प्रमुख कालवे असून, दोन्ही कालव्यांमधून शेतीसाठी व बागायतीसाठी पाणी सोडले जाते. साधारण डिसेंबरनंतर धरणाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा लागतो. नातूवाडी धरणाच्या सिंचनक्षेत्रात २०हून अधिक गावे असून, २ हजार ५० हेक्टर क्षेत्र जलसिंचन करण्याची या धरणाची क्षमता आहे.
सद्यःस्थितीत नातूवाडी, बोरघर, खवटी, उधळे, वावे, आपेडे, कळंबणी, भरणे, भडगाव, खोंडे, चाकाळे, मुरडे, आंबये, जामगे, शिवतर या गावांच्या परिसरामध्ये १५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. बागायती क्षेत्र वगळता काही गावातील शेतकरी आता दुबार भातशेती, कडधान्य करत असून, काही शेतकऱ्यांनी भातशेतीला पर्याय म्हणून भुईमुगाची लागवड केली आहे.
---
कोट
नातूवाडी धरणामुळे आम्हाला उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या भासत नाही. उन्हाळ्यात आमच्या पंचक्रोशीतील अनेक जमिनी हिरव्यागार दिसून येतात.
--उदयसिंह बोरकर, माजी सरपंच, बोरघर ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT