कोकण

चौथ्या मजल्यावरून पडून सावंतवाडीत विवाहितेचा मृत्यू

CD

चौथ्या मजल्यावरून पडून
सावंतवाडीत विवाहितेचा मृत्यू

बिरोडकर टेंबमधील घटना, मृत बिहारची

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : शहरातील बिरोडकर टेंब येथील द्वारकानगरी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका सातमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. रुबी खातून मुन्ना खान (मूळ पूर्व चंपारण, बिहार) असे तिचे नाव आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबी या पतीसोबत इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत राहत होत्या. शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांच्या खोलीतील वीज गेली. रुबी या त्यांचे पती आशू साबीर हुसेन आणि शेजारी हसन सय्यद यांच्यासह चौथ्या मजल्यावर लावलेली ट्यूबलाईट काढण्यासाठी गेल्या होत्या. चौथ्या मजल्यावर हसन ट्यूबलाईटची वायर काढत असताना पती आशू त्यांना मोबाईलचा टॉर्च दाखवत होते. यावेळी रुबी जवळच उभ्या राहून मोबाईल पाहत असताना त्यांचे संतुलन बिघडले किंवा अंधारामुळे अंदाज चुकला आणि त्या चौथ्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून थेट खाली कोसळल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने दुचाकीवरून उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल केले, मात्र उपचारांदरम्यान रात्री ९ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक श्री. कांबळे, निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक मुळीक करत असून, मृत महिलेचे माहेरचे नातेवाईक बिहार येथून आल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT