कोकण

रघुनाथ गोरेंना मिळाला यांत्रिक व्हीलचेअरचा आधार

CD

-rat४p५.jpg-
26O35293
रत्नागिरी : यांत्रिक व्हीलचेअरवर रघुनाथ गोरे, सोबत आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिकभाई नाकाडे.
-----
रघुनाथ गोरे यांना व्हीलचेअरचा आधार
आरएचपी फाउंडेशन; नवा व्यवसाय करण्याचा मानस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : तिसंगी (ता. खेड) येथील रघुनाथ गोरे (वय ३९) यांना आरएचपी फाउंडेशनकडून निओमोशन यांत्रिक व्हीलचेअरचा आधार मिळाला आहे. आता लांब अंतरापर्यंत जाऊन काम करणे सहजशक्य होणार आहे. शारीरिक त्रास खूप कमी होणार असून, यामुळे गोरे यांनी नवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एका व्हीलचेअरमुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे.
गोरे सात महिन्याचे असताना त्यांना पोलिओने ग्रासले. दोन्ही पायांना ९० टक्के अपंगत्व आले. त्यामुळे चालता आले नाही. पहिलीपासून चुलत्यानी पिंपरी, चिंचवड अपंग विद्यालय या शाळेत शिक्षणासाठी ठेवले. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. २००४ ला शाळा सोडली आणि गावी वडिलांना शेतीत मदत करू लागले, तेव्हा ते ट्रायसिकल चालवायचे. नंतर आई-वडिलांना शेळीपालन व्यवसायात साफसफाई करून मदत करायचे. पाच वर्षापासून रत्नागिरीच्या आशादीप या अपंगासाठी काम करणाऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करू लागले. तिथे संस्थेतच राहण्याची, जेवणाची सोय आहे.
उद्योगधंद्यासाठी कर्ज काढायचा विचार सुरू होता तेव्हा त्यांच्या मित्रामुळे रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन या संस्थेची माहिती मिळाली. या संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी व्यवसायासाठी कर्ज काढण्याविषयी मार्गदर्शन केले; पण ट्रायसिकल हाताने चालवून व्यवसाय करणे खूप अवघड जाणार म्हणून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून निओमोशन या इलेक्ट्रॉनिक गाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्नेहज्योत दिव्यांग प्रतिष्ठान (बोरिवली मुंबई) या संस्थेत नावनोंदणी केली. या संस्थेतर्फे तीनजणांना गाडी मिळाली. त्यात आरएचपी फाउंडेशन यांच्या सहकार्याने रघुनाथ गोरे यांना निओमोशनची गाडी मिळाली.
-----
आरएचपीचे जिल्ह्यात कार्य
रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे जिल्ह्यात सर्वदूर कार्य सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथील पॅराप्लेजिक दिव्यांग व अन्य दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती तसेच निओमोशन व्हीलचेअर, यांत्रिक गाड्या मिळण्याकरिता मदत केली जात असल्याचे अध्यक्ष नाकाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT