कोकण

कोकणातील पारंपरिक नमन कलेला नवचैतन्य

CD

rat४p१०.jpg
P26O35311
ः संगमेश्वर ः कोकणातील नमन कलेला जत्रा, धार्मिक कार्यक्रमातून मागणी वाढत आहे.
-------

कोकणातील नमन कलेला नवचैतन्य
जत्रा, धार्मिक कार्यक्रमांत पसंती; लोककला पुन्हा तेजीत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः कोकणातील पारंपरिक नमन लोककलेला सध्या नवसंजीवनी मिळाली आहे. गावोगावी होणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या कलेची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे.
सार्वजनिक महापूजा, सत्यनारायण पूजा, लग्नसमारंभ तसेच ग्रामदैवतांच्या जत्रांमध्ये नमन कार्यक्रमांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कलाकारांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असून, रसिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी वीज किंवा आधुनिक साधने नसताना गॅसबत्तीच्या प्रकाशात नमन सादर केले जात असे. त्या काळात लोक अनेक किलोमीटर पायी चालत जाऊन नमन पाहत असत. आज आधुनिक ध्वनी व प्रकाशयोजनांमुळे सादरीकरण अधिक आकर्षक झाले असले तरी कलेचा पारंपरिक आत्मा कायम आहे.
सध्या प्रत्येक तालुक्यात अनेक नमन मंडळे कार्यरत असून, कलाकार स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत प्रयोग सादर करत आहेत. दिवसभर काम किंवा शिक्षण करून रात्री रंगमंचावर उभे राहणारे कलाकार ही परंपरा जपताना दिसतात.
नमन सादरीकरणात गण, गवळण, फार्स व वगनाट्य यांचा समावेश असतो. विनोदी संवाद, राधा-कृष्ण कथा आणि पौराणिक प्रसंग रसिकांना आकर्षित करतात. जत्रांचा हंगाम आणि शासनाच्या महोत्सवांमुळे नमनकलेचे सुवर्ण दिवस पुन्हा परतल्याची भावना व्यक्त होत आहे.
------
कोट
मी पूर्वी नमन लोककलेचा आस्वाद घेतला आहे. आता काळ बदलला तशी आता अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत. मी शिव शंभो नमन मंडळ संगमेश्वर या कार्यक्रमात सहकलाकार म्हणून काम करत आहे. सकाळी शाळेत, रात्री कोकणची लोककला सादर करतो. जेव्हा आम्ही कलाकार रसिकांसमोर जातो तेव्हा रसिक टाळ्यांचा गजर करतो तेव्हा वाटतं की, आपल्या लोककलेची लोकप्रियता वाढत आहे, हे एक कलाकार म्हणून नक्कीच समाधान आहे.
------ श्लोक देवरूखकर, नमन कलाकार, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT