कोकण

खेड बसस्थानकावरील उपहारगृह अखेर सुरू

CD

खेड बसस्थानकावरील
उपहारगृह अखेर सुरू
खेड, ता. ५ : गेल्या सहा ते सात वर्षांपासून बंद असलेले खेड बसस्थानकावरील उपहारगृह ३ एप्रिल पासून प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा खुले केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
खेड बसस्थानक हे दापोली, मंडणगडसह तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. कोरोना कालावधीनंतर प्रवासी संख्या घटल्याने आणि ग्राहक नसल्यामुळे उपहारगृह चालवणे कठीण झाले होते. त्यातच एस. टी. महामंडळाचे भाडे परवडणारे नसल्याने गेल्या ६ ते ७ वर्षांपासून हे उपहारगृह बंद होते. या प्रश्नाबाबत सातत्याने आवाज उठवला होता. एस. टी. महामंडळाचे भाडे अतिरिक्त असल्याचे प्रशासनाला पटवून दिल्यानंतर, होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि उपहारगृह पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. महामंडळाने भाड्यात कपात करून पुन्हा निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर अखेर ३ एप्रिल रोजी उपहारगृह सुरू झाले आहे. दीर्घकाळानंतर उपहारगृह सुरू झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

तुम्हीच लग्न करून मुलं का जन्माला का घालत नाही, शंकराचार्यांचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल

भारताची लेक बनणार वॉशिंग्टनची महापौर? कोण आहे ३१ वर्षीय रिनी संपत?

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

Sunetra Pawar: अवकाळी पावसामुळे हातात आलेलं पीके गेली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, बारामतीतील शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी..

SCROLL FOR NEXT