मालवणात १४ एप्रिलला
संयुक्त जयंती महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम १४ एप्रिलला येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी ८.३० वाजता समाजमंदिर येथे अभिवादन, ९ वाजता समाजमंदिर, बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बांगीवाडा-मालवण अशी भव्य धम्म रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात सभा होणार असून सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्र सेवादल, कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बाबासाहेब नदाफ हे प्रमुख पाहुणे, तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रा. कैलास राबते, नगरसेवक तथा मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका तथा आरोग्य स्वच्छता समिती सभापती पूनम चव्हाण, कणकवली येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार, लेखक व नाटककार डॉ. श्रीकांत धारपवार यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता लोकशाहीर सदाशिव निकम (कोल्हापूर) यांचा ‘शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी जलसा’ कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.