कोकण

पिंपरी-चिंचवड येथे ''मालवणी भाषा दिन''

CD

35500

पिंपरी-चिंचवड येथे
‘मालवणी भाषा दिन’

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ : मालवणी नाटयसृष्टीचे सम्राट दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, पिंपरी-चिंचवडच्या वतीने ‘मालवणी भाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. थेरगाव येथील सिंधुदुर्ग भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कलाविष्कारांतून मालवणी बोलीचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमात मंडळाच्या ‘नाट्य सिंधू’ विभागातर्फे ‘गेलंय भजनाक, पोहचलय लग्नाक’ ही मालवणी एकांकिका सादर करण्यात आली. यासोबतच कलाकारांनी उखाणे, मालवणी गजाली, एकपात्री नाटक आणि गायन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या सादरीकरणात चंद्रकांत गायकवाड, यशवंत गावडे, संतोष गावडे, राजेश कांडर, विद्या मेस्त्री, स्वाती गावडे, प्रदीप कोरगावकर, विजय आयरे, रुपेश कानेकर व आर्वी गावडे या कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, ''नाट्य सिंधू''चे अध्यक्ष राजेश कांडर, उपाध्यक्ष अरुण दळवी, महादेव कवितके, प्रमोद राणे, परशुराम प्रभू, अशोक राणे, दीपक राणे, नरेंद्र धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मालवणी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT