कोकण

मराठी भाषा, मराठी शाळा सर्वोत्कृष्ट

CD

rat६p२.jpg-
26O35623
रत्नागिरी ः सिंधुरत्न परीक्षेतील गुणवंतांचा नाखरे शाळा नं. १ येथील विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर. सोबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. निधी पटवर्धन व शिक्षक.

मराठी शिक्षणामुळेच यशाची दारे खुली
डॉ. निधी पटवर्धन ः सिंधुरत्न परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः जगाच्या पाठीवर फिरताना आपली भाषा मराठी असल्याचा तसेच आपले शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाल्याचा अडसर कुठेही येत नाही. याउलट आपली मातृभाषा, मराठी शाळाच सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत माहिती देताना तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ येथे त्या बोलत होत्या. या वेळी मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे, शिक्षक सुहास वाडेकर, अंगणवाडीताई मंगला चव्हाण, सेविका योगिता शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भाषानिधी मासिक स्पर्धेत विजेते विदयार्थी, शिक्षक यांचा गौरव होणार असून, त्यांच्या जवळच्या शहरातील सर्वोत्तम हॉटेलमध्ये भोजन आणि शालेय मराठी शब्दकोश भेट, मराठी विषय शिक्षकाला दोन दिवसांच्या प्रवाससुविधेसह भारतातील मराठी माहात्म्य स्थळदर्शन वाहिनीकडून भेटस्वरूप असल्याची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी शाळेत शिक्षण घेऊन देश-विदेशात फिरताना उच्चशिक्षणातही आपण कुठे कमी पडलो नसल्याचे सांगत त्यांनी विदयार्थ्यांना नवी उर्मी दिली. तसेच मराठी शुद्धशब्द लेखनात विजेता ठरलेला अरूष शिंदे याला त्यांनी पुस्तकभेट देऊन प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वयंपाकी पूजा धुळप, मदतनीस मनीषा धुळप, अपेक्षा नार्वेकर, मीना राजू मंच यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
विद्यार्थ्यांचा केला सन्मान
निकाल जाहीर झालेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रज्वल साळवी (इ. दुसरी), श्रावणी मेस्त्री, दूर्वा धुळप, आरूष गावडे, सिया वाळिंबे, तिर्था कुळये, निहार घवाळी (इ. सहावी) यांचाही सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT