कोकण

तारकर्ली-देवबागचे रस्ते ‘मृत्यूचे सापळे’

CD

35706

तारकर्ली-देवबागचे रस्ते ‘मृत्यूचे सापळे’

दोन्ही बाजूंनी चाळण; ‘जलजीवन’, ‘महावितरण’चे खोदकाम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : जगाच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या तालुक्यातील तारकर्ली-देवबागचे रस्ते सध्या ‘मृत्यूचे सापळे’ बनले आहेत. जलजीवन मिशन आणि ‘महावितरण’च्या गलथान कारभारामुळे देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली दरम्यानच्या रस्त्याची दोन्ही बाजूंनी चाळण झाली असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, ३० एप्रिलपर्यंत रस्ता सुस्थितीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी पत्रकाद्वारे दिला.
काही काळापूर्वी नौदल दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त केला होता; मात्र त्यानंतर लगेचच जलजीवन मिशन आणि ‘महावितरण’ने भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आणि मधोमध मोठे चर खोदले. हे खोदकाम करून दोन वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ववत केलेला नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने वाळूत आणि खड्ड्यांत रुतून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेले चर आणि खचलेल्या बाजूपट्ट्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. ‘‘महावितरण’ने रस्ता दुरुस्तीचा निधी देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप निविदा प्रक्रिया का पूर्ण केली नाही,’’ असा प्रश्न बापर्डेकर यांनी उपस्थित केला. पावसाळा तोंडावर असल्याने आणि पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने हा रस्ता तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर होणाऱ्या अपघातांना आणि नागरिकांच्या रोषाला सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन प्राधिकरण आणि ‘महावितरण’ जबाबदार राहील, असेही पत्रकात नमूद आहे.
--------
तारकर्लीच्या लौकिकाला बट्टा
उत्तम डांबरीकरणामुळे देखणा वाटणारा हा रस्ता आता विद्रुप झाला असून, त्यामुळे तारकर्ली गावाच्या लौकिकाला बट्टा लागत आहे. गत वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. यंदा तशी परिस्थिती उद्‍भवू नये म्हणून केवळ खडी न टाकता ‘हॉट मिक्स’ डांबरीकरणाची मागणी केली आहे.
----------
कोट
अधिकारी केवळ पाहणी करतात आणि ‘लवकरच करू,’ असे आश्वासन देतात. निधी उपलब्ध असेल, तर कामाला विलंब का? मंत्र्यांनी फेरफटका मारला तरच रस्ते नीट होणार का? प्रशासनाने वाहनधारकांच्या संयमाचा अंत पाहू नये.
- सुरेश बापर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT