कोकण

भाजप पक्ष देश विकासाचा आधार ः विशाल परब

CD

भाजप पक्ष देशविकासाचा
आधार ः विशाल परब

सावंतवाडीत स्थापना दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ : ‘‘भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती विचारांची, त्यागाची आणि देशसेवेची एक सशक्त चळवळ आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टावर उभा असलेला हा पक्ष आज देशाच्या विकासाचा आधारस्तंभ बनला आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे स्थानिक नेते विशाल परब यांनी येथे केले.
येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ​कार्यक्रमाची सुरुवात उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाली. भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. श्री. परब पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विकासाची नवी उंची गाठली असून, या विचारधारेचा प्रसार गावागावांत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने निःस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करत राहणे, हीच खरी पक्षसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, उपसभापती गौरव मुळीक, माजी नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख साईनाथ जामदार, उपाध्यक्ष सुमित वाडकर, संतोष गावस, समीर कुडाळकर, विजय रेडकर आदी उपस्थित होते. सर्वांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त करत पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT