35649
नारायण राणे
कुडाळात शिंदे सेनेतर्फे
उद्या महाआरोग्य शिबिर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. ८) सकाळी ८ वाजता सिद्धिविनायक हॉल, कुडाळ येथे महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध मोफत तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये कोलेस्ट्रॉल तपासणी (उपाशीपोटी), मधुमेह तपासणी, कॅल्शियम तपासणी, महिलांसाठी थायरॉईड तपासणी, तसेच ईसीजी, रक्तशर्करा, रक्तदाब चिकित्सा व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी चेतन पडते, आबा धडाम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.