कोकण

वाद्य वादन, नृत्य प्रकारांत मुलांच्या कौशल्याची मोहोर

CD

35651

वाद्य वादन, नृत्य प्रकारांत
मुलांच्या कौशल्याची मोहोर

‘मदर क्वीन्स’चे परीक्षांमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई मार्फत आयोजित विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. वाद्य वादन आणि नृत्य अशा दोन्ही कलाप्रकारांत आपल्या कौशल्याची मोहोर उमटवत मोठे यश प्राप्त केले.
​तबला या वाद्य प्रकारात स्मीत सावंत याने विशेष योग्यता प्राप्त केली. अद्वैत मुंगी व तनीष गावडे यांनी प्रथम श्रेणी आणि रुद्र सावंत याने द्वितीय श्रेणी मिळवली. पखावज या वाद्य प्रकारात विस्मय तेली याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. हार्मोनियम वादन परीक्षेत सुभाष गवस याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. नृत्यामध्ये भरतनाट्यम परीक्षेत प्रचिती गिरप, श्रेया मोर्ये व काव्या मांजरेकर यांनी प्रथम श्रेणी मिळवली. कथ्थक नृत्य परीक्षेत दृष्टी मुंड्ये हीने विशेष योग्यता प्राप्त केली, तर आरोही भाग्यवंत, स्वरा धुरी, लावण्या केसरकर व वैष्णवी बोडके यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. आहिशा कांडारकर हीने द्वितीय श्रेणी मिळवली.
​या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी अभिनंदन केले. मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर आदींनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT